• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

क्‍वारंटाइन सेंटरची “एफडीए’कडून पाहणी

माहिती न घेताच केली पाहणी : आकुडीतील सेंटरमध्ये बाहेरुन आणले जाते अन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 20, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तासंस्था) – पिंपरी, ‘करोना’चा संसर्ग होण्याचा अधिक धोका असलेल्या नागरिकांना महापालिकेकडून क्‍वारंटाइन केले जाते. या नागरिकांना ‘करोना’ होऊ नये, यासाठी रोग प्रतिकारशक्‍ती वाढावी म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज असते. परंतु क्‍वारंटाइन सेंटरमध्ये वेळेवर आणि चांगले अन्न पुरविले जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या पथकाने अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी येथे भेट दिली. परंतु भेट देण्यापूर्वी कोणतीही माहिती न घेतल्याने तिथे गेल्यावर पथकाला कळाले की येथे अन्न शिजविले जात नाही, तर बाहेरुन आणले जाते.
महापालिकेने करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांसाठी आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये बनविलेल्या क्‍वारंटाइन सेंटरमधील किचनची परिस्थिती पाहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) पथकाने नुकतीच भेट दिली. संबंधित केंद्रातील नागरिकांसाठी बाहेरून तयार अन्न आणले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे अन्न जेथून आणले जात आहे, तेथील पाहणी करण्याचे नियोजन एफडीएने केले आहे.

‘एफडीए’चे अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत यांच्यासह पथकाने नुकतीच पाहणी केली आहे. क्‍वॉरंटाइन सेंटरमधील नागरिकांसाठी जेथून अन्न आणले जात आहे, तेथील स्वच्छता व अन्य बाबींची तपासणी केली जाणार आहे. त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित अन्न पुरवठादाराविरुद्ध कारवाई केली जाईल, असे ‘एफडीए’चे सहाय्यक आयुक्‍त संजय नारागुडे यांनी सांगितले.

मोशी येथे सापडल्या होत्या अळ्या
महापालिकेने मोशी येथील समाजकल्याण विभागाच्या मागासवर्गीय वसतिगृहात बनविलेल्या क्‍वारंटाइन सेंटरमध्ये नाश्‍त्यात अळ्या व केस सापडण्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर ‘एफडीए’कडून संबंधित क्वारंटाइन सेंटरची पाहणी करण्यात आली होती. त्या वेळी संबंधित क्‍वारंटाइन सेंटरमधील किचनमध्ये अस्वच्छता आढळली. तसेच, तेथील अन्न पुरवठादाराकडे योग्य परवाना नसल्याचे देखील निदर्शनास आले. त्यास अनुसरून संबंधित पुरवठादाराकडून ‘एफडीए’ने 11 हजार 150 रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच, संबंधित पुरवठादाराला तीन दिवसांमध्ये त्रुटी पूर्तता करावी, असे स्पष्ट करण्यात आले.

कधी होणार कारवाई?
संसर्ग होण्याचा अधिक धोका असलेल्या नागरिकांना क्‍वारंटाइन करण्यात येते. या नागरिकांच्या आरोग्याची आणि आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. परंतु महापालिका प्रशासनाने येथेही निष्काळजीपणा दाखविला. गेल्या एक आठवड्यापासून येथील नागरिक तक्रार करत आहेत आणि अद्यापही ‘एफडीए’कडून पाहणीचे नियोजनच करण्यात येत आहे. यामुळे कारवाई कधी होणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

वायसीएमच्या उपहारगृहातही आढळली होती अस्वच्छता
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात 20 ते 25 दिवसांपूर्वी तपासणी करण्यात आली होती. रुग्णालयात उपाहारगृहात अस्वच्छता आढळली होती. त्यामुळे कॅन्टीन चालकाला त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. अद्याप त्याचे उत्तर ‘एफडीए’ला प्राप्त झालेले नाही.


 

 

Previous Post

कुलर चालू करण्यासाठी व्हेन्टिलेटरचाचं काढला प्लग, कोरोना रुग्णाचा मृत्यू

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली आहे का? -चिदंबरम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली आहे का? -चिदंबरम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट
1xbet russia

पदवीनंतर शब्द दिला तो खरा आयुष्यातला टर्निंग पॉईंट

February 27, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
जैन कंपनी

कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

February 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

आठवीतील विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

February 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon