जळगाव ( प्रतिनिधी ) – आयकर रिटर्न भरताना योग्य ती काळजी न घेतल्यास करदात्यांना आयकर विभागाकडून कराची मागणी नोटीस येणे किंवा टीडीएस क्रेडिट न मिळणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामूळे करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी असे प्रतिपादन सुनिता व्ही. लँगस्टिएह, उपायुक्त, प्राप्तिकर (सर्कल १), जळगाव यांनी आज येथे केले.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या डॉ. अनिकेत सेमीनार हॉलमध्ये तफावत व मागणी नोटीस टाळण्यासाठी आयकर विभागाचा सल्ला देण्यासाठी त्या आल्या होत्या यावेळी त्यांचे सोबत सदस्य गोदावरी फॉउंडेशन व डी एम कॉर्डीओलॉजीस्ट डॉ.वैभव पाटील, अधिष्ठाता डॉ प्रशांत सोळंके, कृष्णमुर्ती अयर,दिपक गुप्ता,मणी भगत,दिपक श्रीवास्तव,आणि रविंद्र कुमार इ अधिकारी वर्ग उपस्थीत होता. मार्गदर्शन सत्रात तज्ज्ञांनी करदात्यांसाठी काही महत्त्वाच्या बाबी मांडतांना कृष्णमुर्ती अयर यांनी चित्रफितीव्दारे कराची मागणी निर्माण होण्याची प्रमुख कारणे: टॅक्स क्रेडिट तफावत: आयकर विभागाच्या नोंदी आणि करदात्याने रिटर्नमध्ये केलेला दावा यातील फरक.अॅडव्हान्स टॅक्स न जुळणे: जमा केलेला कर सीपीसी च्या रेकॉर्डशी पूर्णपणे न जुळणे. उत्पनातील फरक: घोषित उत्पन्न आणि सीपीसीद्वारे प्रक्रिया केलेले उत्पन्न यातील तफावत.व्याज किंवा इतर बदल: रिटर्नच्या प्रक्रियेदरम्यान लावण्यात आलेले व्याज किंवा अन्य अॅडजस्टमेंट. मागील वर्षांची थकबाकी: पूर्वीच्या वर्षांतील प्रलंबित मागणीमुळे चालू वर्षाच्या परताव्यात अडथळा करदात्यांसाठी आवश्यक चेकलिस्ट नोंदणीकृत मोबाईलवर आलेले मेसेज तसेच ई-फायलिंग पोर्टल वेळोवेळी तपासणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सुनिता व्ही यांनी फॉर्म२६ ए एस हे एका प्रकारे टॅक्स पासबुकसारखे असते. वार्षिक आर्थिक विवरण पत्र हे तुमच्या पॅन कार्डशी जोडलेले आर्थिक माहितीचे विवरणपत्र आहे, ते नक्की तपासून पाहणे गरजेचे असल्याचे सांगितले. उपस्थीतांचे शंका निरसन कपात केलेला टीडीएस पोर्टलवर न दिसल्यास संबंधित कपातदाराशी संपर्क साधून दुरुस्ती करून घ्या.कोणत्याही प्रकारची चूक आढळल्यास पोर्टलवरून दुरुस्ती तक्रार अर्ज त्वरित दाखल करा.‘अचूक माहिती देणे आणि माहितीचे योग्य जुळवाजुळव करणे हाच नोटीस टाळण्याचा एकमेव मार्ग आहे असल्याचे सांगितले.यावेळी गोदावरी फॉउंडेशनच्या सर्व संस्थाचे प्राचार्य,अधिष्ठाता आणि डॉक्टर व प्राध्यापक वर्ग उपस्थीत होता.










