जुन्या वादातून तरुणावर चॉपरने हल्ला; दोघे अटकेत


पिंप्राळा हुडको परिसरातील घटना; हल्ल्यात तरुण जखमी
जळगाव | प्रतिनिधी : जुन्या वादातून तरुणावर चॉपरने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास संविधान चौक, पिंप्राळा हुडको, जळगाव येथे फिर्यादी रईस शेख नूर मोहम्मद (वय २८, व्यवसाय भंगार विक्री, रा. खोली क्र. २०, दूध फेडरेशन, पिंप्राळा हुडको, जळगाव) यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी सुमित संजू शेजवळ (रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने जुन्या वादातून हा हल्ला केला आहे .या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३५२ आणि ३(५) प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशिवरे करीत आहेत.अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे तसेच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.









