घरातील लोखंडी पाइपला गळफास घेत २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू


एरंडोल | प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील उत्तरण बु. येथे २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी पाइपला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल
समाधान सुभाष भिल (वय २८, रा. उत्तरण बु., ता. एरंडोल, जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. २३ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपासून ते २४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपूर्वीच्या दरम्यान त्याने राहत्या घरात गळफास घेतल्याचे नोंदविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर संभाजी काशीनाथ भिल व किरण आनंदा सोनवणे यांनी त्याला पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, एरंडोल येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
कासोदा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
घटनेप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक १९/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नंदलाल केशरीमल परदेशी करीत आहेत.









