महादेव हॉस्पिटलमध्ये शहीद जवानांच्या परिवारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
जळगाव ( प्रतिनिधी ) – ना. गिरीष भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून महादेव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगाव येथे शहीद जवानांच्या परिवारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याच्या उद्देशाने सर्व विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन विरमाता शिंदे ताई विरपत्नी व माजी सैनिक, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलमधील विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थितांची आरोग्य तपासणी केली. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह तसेच इतर आवश्यक आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सैनिक सेलचे सी डी पाटील, बडगुजर, जी एम फाउंडेशन चे उदय भालेराव,गिरीष भाऊ पितांबर भावसार आणि वैद्यकीय संचालक डॉ. एन. एस. आर्विकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भारत मातेचे पूजन करून शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली व वीर माता व वीर पत्नी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना माजी खासदार डॉ. उल्हास पाटील म्हणाले, देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या शहीद जवानांच्या परिवारांची जबाबदारी ही आपली सर्वांची आहे. त्यांच्या आरोग्यासाठी ना. गिरीष भाऊ महाजन यांचा सहकार्याने महादेव हॉस्पिटल सदैव तत्पर राहील. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आवश्यक वैद्यकीय सेवा आणि योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.देशसेवेसाठी बलिदान देणार्या जवानांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. ना. गिरीष भाऊ महाजन यांनी व्हिडीओ कॉल द्वारे शाहिद जवान यांच्या परिवाराशी संवाद साधून त्यांचा आरोग्याची विचार पूस केली. कार्यक्रमास प्रमुख मान्यवार आमदार राजु मामा भोळे,भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका उज्वला बेंडाळे,उदय जी भालेराव उपस्तित होते. आरोग्य दूत पितांवर भावसार यांनी शिबीर समन्वयक म्हणून काम केले. महादेव हॉस्पिटलचे एन. जी. चौधरी तज्ञ् डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सैनिक सेलचे पदाधिकारी तसेच शहीद जवानांचे कुटुंबीय उपस्थित होते.











