अमळनेर (प्रतिनिधी) – येथे तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धा तालुका क्रीडा संकुल मध्ये झाल्या. या स्पर्धेत एकूण २२ संघ सहभागी झाले होते. आज अंतिम सामना खा,शि.मं वि आश्रम शाळा अंतुर्लि विरुध्द यांच्यात झाला. सदर सामना प्रथम आश्रम शाळा व खा शि ४८रन ७ ओव्हर मध्ये बरोबरीत सुटला. नंतर सुपर ओव्हर मध्ये खा,शि.ने १० रन केले तर अंतुर्ली आश्रम शाळेचा संघ फ़क्त ७ रन करु शकले यामुळे खानंदेश शिक्षण मडळं संघने ३ रनांनी सामना जिंकला ,
खानंदेश शिक्षण मडळं संघ कडुन- दिपक सुरळकर ,गौरख चौधरी,आर जे पाटील ,यु.ए हिरे ,के पी सनेर ,सी आर पाटील ,ए के छाजेड,एम जी पाटील ,जे व्ही बाविस्कर ,यांनी अतिशय उत्कृष्ट खेळ केला, तर आश्रमकडुन अतुल बोरसे,राज जाधव ,उमेश लाडगे,राज गिरासे, पंकज पाटील ,राकेश पाटील यांनी एकाकी लढत दिले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमळनेर तालुका क्रीडा प्रमुख एस पी वाघ सर ,समिती सदस्य एस के पाटील ,डी डी राजपुत ,एन डी विसपुते ,के यु बागुल ,महेश माळी ,ए के अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.