• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

६०० किलो संशयित गोमांस जप्त, तीन गोवंशांची सुटका; फरार आरोपीचा शोध सुरू

रावेर (प्रतिनिधी) : रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने आभोडा येथे अवैधरीत्या गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत एकाला अटक केली असून एक संशयित फरार झाला आहे. या कारवाईत एकूण सुमारे ६०० किलो संशयित गोमांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी कुऱ्हाड व सुरे जप्त करण्यात आले. तसेच कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या तीन गोवंशांची सुटका करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे पहिली धाड

पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी गुन्हे शोध पथकाने आभोडा येथील बसस्टँड परिसरात धाड टाकली. तेथे उस्मान हसन कुरेशी (वय ४८, रा. आभोडा) हा राहत्या घरात दोन गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी तयार करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून अंदाजे ३०० किलो संशयित गोमांस (किंमत सुमारे ६० हजार रुपये) तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी कुऱ्हाड व सुरे जप्त करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत नमुने घेऊन उर्वरित मांसाची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली.

दुसऱ्या ठिकाणी आरोपी फरार

त्यानंतर पथकाने आभोडा येथील चावडी भागात दुसरी धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच इरफान रहेमान उर्फ लंगड्या कुरेशी (वय ३२, रा. आभोडा) हा गल्लीबोळांचा फायदा घेत फरार झाला. त्याच्या घरातूनही अंदाजे ३०० किलो संशयित गोमांस, कुऱ्हाड व सुरे जप्त करण्यात आले. या मांसाचेही नमुने घेऊन उर्वरित मांसाची विल्हेवाट लावण्यात आली.

तीन गोवंशांची सुटका

फरार आरोपीचा शोध घेत असताना पथकाला आभोडा परिसरातील आठवडे बाजाराजवळ कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेले तीन गोवंश आढळले. अंदाजे २७ हजार रुपये किमतीच्या या जनावरांची सुटका करून त्यांना पुढील संगोपनासाठी गोशाळेत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.

गुन्हा दाखल, तपास सुरू

या प्रकरणी पोलिस शिपाई विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम, १९९५ (सुधारित २०१५), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अवैध कत्तलखान्यांवर कठोर कारवाईचा इशारा

गोवंश कत्तल आणि अवैध गोमांस विक्रीविरोधात पुढील काळातही कठोर भूमिका घेत अशा अवैध कत्तलखान्यांवर सातत्याने कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत शिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Previous Post

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

वाघारी येथे मोबाईल टॉवरवरून ५० हजारांचे साहित्य लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

वाघारी येथे मोबाईल टॉवरवरून ५० हजारांचे साहित्य लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

जळगावातील भवानीपेठेत गोडाऊनसमोरून ५२ हजारांची मशिनरी लांबवली; शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

चिंचखेडा शिवारात शेतीपंपांच्या तांब्याच्या वायरींची चोरी; २१ हजारांचे नुकसान, जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

वाघारी येथे मोबाईल टॉवरवरून ५० हजारांचे साहित्य लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार
1xbet russia

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

जळगावातील भवानीपेठेत गोडाऊनसमोरून ५२ हजारांची मशिनरी लांबवली; शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

चिंचखेडा शिवारात शेतीपंपांच्या तांब्याच्या वायरींची चोरी; २१ हजारांचे नुकसान, जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!