• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 7, 2026
in Uncategorized
0
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ: भुसावळ शहरातील हुडको कॉलनी भागात एका बंद घराचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करत लाकडी कपाटातील तब्बल १ लाख ८० हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, अजय राजकुमार सभांग चदाणी (वय ३०, व्यवसाय- कपड्यांचे दुकान, रा. फ्लॅट नं. २०२, दुसरा मजला, गजानन अपार्टमेंट, गजानन मंदिराजवळ, हुडको कॉलनी, भुसावळ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.०० वाजेच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली.

फिर्यादी घर बंद करून गेलेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अनधिकृतपणे आत प्रवेश केला. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले १ लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच ४५ हजार रुपयांची रोख रक्कम (५०० रुपयांच्या १८० नोटा) असा एकूण १ लाख ८० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने पळवून नेला.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये ४५ हजार रुपये किमतीचे १७ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व साखळी, २८ हजार रुपये किमतीचे १२ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स (३ जोड्या), १६ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १६ हजार रुपये किमतीची ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी, १२ हजार रुपये किमतीचे लहान मुलीचे सोन्याचे टॉप्स (२ जोड्या), ६ हजार रुपये किमतीच्या लहान मुलीच्या सोन्याच्या चार अंगठ्या, ८ हजार रुपयांची सोन्याची ‘ओम’ आकाराची दोन पेंडंट्स, ३ हजार रुपयांचे ४० ग्रॅमचे चांदीचे पैंजण आणि १५०० रुपयांचे २० ग्रॅमचे चांदीचे जोडवे यांचा समावेश आहे.

या प्रकरणी ६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०५ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ३६७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(a) व ३३१(१)(३) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले आणि पोलीस निरीक्षक राहुल तुकाराम वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद अली सय्यद करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.

Previous Post

बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणात विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

Next Post

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

रावेर गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई; आभोड्यात गोमांस विक्री प्रकरणी धाड, एक अटकेत, एक फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये  फिजिओ गणेशा २०२६ – विसर्जन

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!