• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 2, 2026
in Uncategorized
0
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

पारोळा: पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा छातीत अचानक तीव्र वेदना होऊन उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (अमृ) नोंद करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चेतन दैवत पाटील (वय ३२, रा. शिरसमणी, ता. पारोळा, जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजेच्या सुमारास चेतन याने त्याच्या कुटुंबीयांना छातीत दुखत असल्याचे आणि ॲसिडिटी झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने ॲसिडिटीची गोळी घेतली व त्याचा त्रास काहीसा कमी झाल्याचे त्याने सांगितले.

मात्र, सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास चेतन याच्या छातीत पुन्हा तीव्र वेदना सुरू झाल्याने तो जोराने रडू लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या वडिलांनी गावातील गोकुळ गिरधर पाटील, विकास संजय पाटील आणि भय्या नाना पाटील यांच्या मदतीने त्याला खाजगी वाहनाने पारोळा येथील पाटील हॉस्पिटलमध्ये सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास दाखल केले.

पाटील हॉस्पिटल येथील डॉ. संकेत खैरे यांनी प्राथमिक पाहणी करून चेतन याला पुढील उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात संदर्भित केले. त्यानंतर कुटीर रुग्णालय येथे आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकाळी १०.३० वाजता चेतन यास तपासून मृत घोषित केले.

या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांच्या माहितीवरून पारोळा पोलीस ठाण्यात नोंद क्रमांक ८०/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक पाटणल यांनी तपासाचे निर्देश दिले. या घटनेचा पुढील सखोल तपास पोलीस नाईक चंद्रशेखर सोनवणे (बकल नंबर १३००) करत आहेत.

Previous Post

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

Next Post

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण
जैन कंपनी

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 2, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
Uncategorized

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
रेल्वे समोर स्वताला झोकून देत वृद्धाची आत्महत्या
Uncategorized

भुसावळ जवळ रेल्वे अपघातात २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू; भुसावळ तालुका पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

August 2, 2026
दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम
Uncategorized

दिवंगत मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ चामकवाडीत सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

August 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

जैन फार्मफ्रेश फूडच्या माध्यमातून राजोरा येथे वृक्षारोपण

August 2, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

छातीत तीव्र वेदना झाल्याने शिरसमणी येथील ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

August 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!