• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2026
in Uncategorized
0
शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

२० वर्षांपासून रखडलेल्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी; जळगाव जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

पुणे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली शारीरिक शिक्षण शिक्षक भरतीच्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे येथे दि. २४ जुलै २०२६ पासून शांततापूर्ण बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. राज्यभरातील बी.पी.एड., एम.पी.एड. व TAIT-2025 पात्र शारीरिक शिक्षण शिक्षकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला असून, शासनाने तातडीने भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महासंघाच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सर्वांगीण विकासासाठी शारीरिक शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय असला, तरी गेल्या जवळपास २० वर्षांपासून शारीरिक शिक्षण शिक्षकांची नियमित भरती झालेली नाही. त्यामुळे हजारो पात्र उमेदवार बेरोजगार असून, शासनाने या प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

यापूर्वी दि. २७ एप्रिल आणि ८ जुलै २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलने करण्यात आली होती. त्यावेळी शासनाने विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची सेवा शर्ती जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे महासंघाने स्पष्ट केले.

सध्या सुरू असलेल्या उपोषणात नागेश पाटील (पंढरपूर), सुमित बंडलकर (सातारा), शुभम ताठे (अहिल्यानगर) आणि प्राजक्ता जोशी (छत्रपती संभाजीनगर) हे उपोषणकर्ते सहभागी झाले आहेत.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची सेवा प्रवेश नियमावली व सेवा शर्ती तातडीने प्रसिद्ध करणे, शासन निर्णयानुसार मंजूर ४,८६० विशेष शिक्षक (क्रीडा) पदांची शंभर टक्के भरती पवित्र पोर्टल (TAIT-2025) च्या पहिल्या टप्प्यात करणे, रिक्त शारीरिक शिक्षण शिक्षक पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरणे, तसेच जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, आश्रमशाळा व समाजकल्याण विभागातील सर्व रिक्त शारीरिक शिक्षण शिक्षक पदांची तातडीने भरती करणे आणि TAIT-2025 भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे या मागण्यांचा समावेश आहे.

महासंघाने हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने सुरू असल्याचे स्पष्ट करत, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा दिला आहे.

या आंदोलनाला महासंघाचे मार्गदर्शक प्रद्युम्न जोशी, कैलास माने, विश्वनाथ पाटोळे, अमोल जोशी, राज्याध्यक्ष संदीप मनोरे, राज्य सचिव तायाप्पा शेंडगे तसेच राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांचे नेतृत्व लाभत आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश वंडोळे यांनी जिल्ह्यातील बी.पी.एड., एम.पी.एड. व TAIT पात्र उमेदवारांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.


 

 

Previous Post

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ७ किलो ११६ ग्रॅम गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत

Next Post

बेकायदा मुरूम वाहतुकीवर वरणगाव पोलिसांची कारवाई; २० लाखांचा डंपर व मुरूम जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

बेकायदा मुरूम वाहतुकीवर वरणगाव पोलिसांची कारवाई; २० लाखांचा डंपर व मुरूम जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
1xbet russia

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी

September 17, 2026
मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon