डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये भक्तिमय वातावरण
जळगाव (प्रतिनिधी):येथील डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स मधील विद्यार्थींनींनी कापडावर विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा साकारत परिसरातून दिंडी काढत भक्तीमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी केली.
या निमित्त महाविद्यालयात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिमय झाला.कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (जीआयएमआर) चे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. वर्षा पाटील बीसीए महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके, डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. नयना झोपे तसेच डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्सच्या प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.आषाढी एकादशीचे औचित्य साधत विद्यार्थिनींनी कापडावर आकर्षक विठ्ठल-रखुमाई चित्रकला (फॅब्रिक पेंटिंग) साकारून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. या कलाकृतींना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.यानंतर महाविद्यालयाच्या वतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. “विठ्ठल… विठ्ठल…” या नामघोषात विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. दिंडीनंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये वारकरी परंपरेची ओळख, भारतीय संस्कृतीबद्दल आदर आणि सामाजिक एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.