मुख्याध्यापक राजेंद्र आंबटकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन; शिक्षकांनी दादांच्या जीवनकार्याला दिला उजाळा
शिरसोली (प्रतिनिधी):- येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात स्वर्गीय श्री. अजित दादा पवार यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि आदरयुक्त वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र आंबटकर सर होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री. राजेंद्र आंबटकर यांच्या हस्ते स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी दादांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक आंबटकर सरांनी स्वर्गीय दादांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल उपस्थितांना थोडक्यात माहिती देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. जी.बी. काळे सर यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि दादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मांडले. त्यानंतर श्रीमती बी. टी. ठाकरे मॅडम यांनी अजित दादा पवार यांच्या जीवनप्रवासावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला आणि त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी कसे प्रेरणादायी आहेत, यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्रीमती कांचन धांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या अभिवादन कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









