• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2026
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
मध्य प्रदेशातील उमर्टी येथे जळगाव पोलिसांची धडक; ३२ वाहने, देशी कट्टे आणि शस्त्रनिर्मितीचा साहित्यसाठा जप्त

४०० हून अधिक पोलिसांचे ‘ऑपरेशन कॉम्बिंग’; फरार आरोपींचा शोध, २७ घरांचे जिओ-टॅगिंग

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेणे आणि आंतरराज्यीय अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करीवर प्रभावी कारवाई करण्याच्या उद्देशाने जळगाव, नाशिक आणि धुळे पोलीस दलाने मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे संयुक्त ‘ऑपरेशन कॉम्बिंग’ राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेत ३२ संशयित वाहने, देशी कट्टे, जिवंत काडतुसे तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260721-WA0011.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260721-WA0021.mp4

पहाटे चार तास चालली शोधमोहीम

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मध्यरात्री संयुक्त पथक कारवाईसाठी रवाना झाले. पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत पार उमरटी गावात नियोजनबद्ध शोधमोहीम राबविण्यात आली. चोपडा शहर, चोपडा ग्रामीण आणि नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल शस्त्र अधिनियम व इतर गंभीर गुन्ह्यांतील फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

४०० हून अधिक पोलिसांचा सहभाग

या विशेष मोहिमेत जळगाव, नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील मिळून ४०० हून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. यासाठी २० शासकीय वाहनांचा ताफा तैनात करण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्यासह विविध उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांनी मोहिमेचे नेतृत्व केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/07/VID-20260721-WA0024.mp4

४५ घरांची झडती; १२ जण ताब्यात

कारवाईदरम्यान गावातील ४५ संशयित घरांची झडती घेण्यात आली. २० जणांची सखोल चौकशी करण्यात आली असून १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन जणांकडून दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

३२ वाहने जप्त, शस्त्रनिर्मितीचे साहित्य हस्तगत

या मोहिमेत पोलिसांनी ३२ निनावी तसेच महाराष्ट्र पासिंगच्या संशयित मोटारसायकली जप्त केल्या. याशिवाय देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, विविध साचे आणि इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले. फरार व संशयित २७ आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांची नोंद करण्यात आली.

आंतरराज्यीय गुन्हेगारीविरोधात प्रभावी पाऊल

अवैध शस्त्रनिर्मिती आणि तस्करीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या या संयुक्त मोहिमेमुळे आंतरराज्यीय गुन्हेगारीविरोधातील तपासाला मोठी चालना मिळाली असून, भविष्यात अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.


 

 

Previous Post

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

तरसोद फाटा येथे एचडीएफसी बँकेत चोरीचा प्रयत्न; सायरन वाजताच चोरटे पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon