डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांचे यश
जळगाव (प्रतिनिधी) – डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर मानसिक आजाराने त्रस्त झालेल्या ५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजारावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार विभागाने समुपदेशन व औषधोपचारांच्या माध्यमातून यशस्वी उपचार करून रुग्णाला नवजीवन दिले आहे. विशेष म्हणजे शासनाच्या योजनेअंतर्गत या रुग्णावर मोफत उपचार करण्यात आले.
काही वर्षांपूर्वी डोक्याला गंभीर मार लागल्यानंतर संबंधित रुग्णाच्या वागणुकीत हळूहळू बदल होऊ लागले. तो स्वतःशीच सतत बडबड करणे, कोणतेही कारण नसताना अचानक रडू येणे, कुटुंबातील सदस्यांवर विनाकारण संशय घेणे, कोणाशीही संवाद न साधणे तसेच जेवण करण्यास नकार देणे अशा गंभीर मानसिक लक्षणांमुळे कुटुंबीय मोठ्या चिंतेत होते. विविध ठिकाणी उपचार करूनही अपेक्षित सुधारणा होत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी रुग्णाला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.रुग्णाची मानसोपचार विभागातील तज्ज्ञ डॉक्टर हुमेद महाडीक, डॉ. आशिष येवले, डॉ. देवांश गणात्रा, डॉ. निकीता खटवानी, डॉ. अभिलाषा राठोड, डॉ. सोनजी गायकवाड, डॉ. रेशल श्रीवास्तव, डॉ. फरीन सुरैय्या यांनी सखोल तपासणी करून त्याला स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचे निदान केले. त्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार, नियमित समुपदेशन, मानसिक स्थितीचे सातत्याने निरीक्षण तसेच कुटुंबीयांनाही आजाराविषयी योग्य मार्गदर्शन करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचार्यांनी समन्वयाने उपचार केल्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत टप्प्याटप्प्याने लक्षणीय सुधारणा दिसून आली.उपचारानंतर रुग्णाची स्वतःशी बडबड करण्याची सवय कमी झाली असून, संशयी वृत्तीवर नियंत्रण आले आहे. त्याचबरोबर तो नियमित जेवण करू लागला असून कुटुंबीयांशी संवाद साधण्यासही सुरुवात केली आहे. मानसिक आरोग्यात झालेल्या या सकारात्मक बदलामुळे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले.

स्किझोफ्रेनिया हा गंभीर असला तरी योग्य वेळी निदान, नियमित औषधोपचार, समुपदेशन आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळाल्यास रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते. मानसिक आजार लपवून न ठेवता तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळाल्यास ते पुन्हा सामान्य जीवन जगू शकतात.
– डॉ. निकीता खटवानी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.