
अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या


चोपडा, ता. चोपडा : तालुक्यातील अकुलखेडा येथे ३५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत व्यक्तीचे नाव समाधान नथींग भिल (वय ३५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला. ही बाब निदर्शनास येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी रुग्णालयात भेट देत आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक धर्मेंद्र ठाकूर करीत आहेत.









