एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी): – एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली परिसरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकारणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील एका भागात राहणारे एक सुशिक्षित दाम्पत्याची अल्पवयीन १७ वर्षाची मुलगी ही काल रविवार, दि. ५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घराबाहेर रोडवर फिरत होती. याच दरम्यान, ती अचानक बेपत्ता झाली.
मुलगी बऱ्याच वेळ झाली तरी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. अखेर याप्रकरणी मुलीचे वडिलांनी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ५ जुलै रोजी रात्री ११:२८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









