• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 4, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांचे यश

जळगाव (प्रतिनिधी) :- सतत पोटदुखी, पोटात दबाव जाणवणे आणि असामान्य रक्तस्त्राव अशा त्रासांनी त्रस्त असलेल्या ४५ वर्षीय महिलेवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भपिशवीतून तब्बल साडेतीन किलो वजनाची मोठी गाठ काढण्यात यश मिळविले. वेळेवर निदान आणि तातडीच्या उपचारांमुळे महिलेचे प्राण वाचले असून सध्या तिची प्रकृती चांगली आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका ४५ वर्षीय महिलेला काही महिन्यांपासून पोटदुखी, पोटात जडपणा आणि दबाव जाणवणे या समस्यांनी त्रस्त होती. त्यासोबतच तिला अनियमित रक्तस्त्रावाचाही त्रास सुरू झाला होता. त्रास वाढत गेल्याने तिने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.रूग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी तिची सविस्तर तपासणी केली. सोनोग्राफी तसेच आवश्यक रक्ततपासण्या करण्यात आल्या. तपासणीअंती महिलेच्या गर्भपिशवीमध्ये सुमारे २० बाय २० सेंटीमीटर आकाराची मोठी गाठ असल्याचे आढळून आले. याशिवाय गर्भपिशवीत इतर काही लहान गाठीदेखील असल्याचे निदान झाले.गाठीचा आकार मोठा असल्याने आणि त्याचा आसपासच्या अवयवांवर दबाव निर्माण होत असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. ऐश्वर्या चलवदे या अनुभवी टीमने शस्त्रक्रियेची संपूर्ण तयारी करून अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भपिशवीतील तब्बल साडेतीन किलो वजनाची मोठी गाठ यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली. तसेच इतर लहान गाठींसह संपूर्ण गर्भपिशवी काढण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर महिलेची प्रकृतीत सुधार होत आहे.

महिलांना पोटदुखी, पोट फुगणे, पोटात जडपणा किंवा असामान्य रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा लक्षणांमागे गर्भपिशवीतील गाठीसारखे गंभीर कारण असू शकते. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार केल्यास मोठ्या शस्त्रक्रियाही यशस्वी होतात आणि रुग्णाचे प्राण वाचविता येतात. या प्रकरणात वेळेवर निदान झाल्यामुळे आम्हाला यशस्वी उपचार करता आले.डॉ. प्राजक्ता पाटील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव खुर्द.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharatmahilechi garbhpishvi kadhli news
Previous Post

‘शून्य मृत्यू जिल्हा’ अभियानाला वेग; रस्ते अपघात रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

Next Post

एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ

एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता
1xbet russia

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन
1xbet russia

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

July 4, 2026
मंदिरातील इलेक्ट्रिक कामादरम्यान विजेचा धक्का; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

मंदिरातील इलेक्ट्रिक कामादरम्यान विजेचा धक्का; १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

July 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

कृषि अभियंता कृषि विकास का सच्चा निर्माता

July 4, 2026
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान — माजी आ. राजाराम महाजन

डॉ. सॅम्युअल हॅनेमन१८३ वी पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन

July 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon