प्रतिनिधी (प्रतिनिधी) :- तालुक्यातील रताळे शिवारातील बोरमाई धरण परिसरात एका २४ वर्षीय विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पीडित महिला आणि तिचा पती झोपडीत झोपलेले असताना महिला बाहेर गेली होती. त्यावेळी संशयित रोशन दादाभाऊ मराठे (रा. कुंझर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याने महिलेस जबरदस्तीने ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४(१) व ७४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन करीत असून, वृत्त लिहीपर्यंत संशयिताला अटक करण्यात आलेली नव्हती.









