‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर विविध उपक्रमांचे आयोजन
जळगाव, (प्रतिनिधी) : येणार आहे. यावर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन “Yoga for Healthy Ageing / निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेवर आधारित असून विविध योग उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.


आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एनएसएस, एनसीसी, पोलिस विभाग, योग संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
योग दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम कॉमन योग प्रोटोकॉल (CYP) नुसार सामुदायिक स्वरूपात राबविण्यात यावेत. यामध्ये योग संगम, योग प्रतिज्ञा, योग सारथी, योग समावेश, हरित योग, योग ३६५, योग बिलबोर्ड आणि योग पार्क यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश आवश्यक आहे.
सर्व संस्थांनी आयुष मंत्रालयाच्या https://yoga.ayush.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून आयोजित कार्यक्रमातील सहभागी संख्या व छायाचित्रे निर्धारित सूचनांनुसार अपलोड करावीत. सहभागी संस्थांना प्रमाणपत्रही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी, नेहरू युवा केंद्र तसेच स्थानिक योग संस्थांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.









