• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कोळन्हावीतील दुर्दैवी अपघात : अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

रात्री लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाला भरधाव वाहनाची जोरदार धडक; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांचा शोध सुरू

यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कोळन्हावी-डांभुर्णी मार्गावरील पाटाच्या चारीजवळ हा अपघात घडला असून, या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन रवींद्र कोळी (वय २४, रा. कोळन्हावी) असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १८) मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पवन कोळी हे कोळन्हावी-डांभुर्णी रस्त्यावरील पाटाच्या चारीजवळ लघुशंकेसाठी थांबले होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार सोनवणे यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कोळन्हावी येथील उमेश दिलीप परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या अपघातामुळे कोळन्हावी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार करीत आहेत.


 

 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

Next Post

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!
1xbet russia

एक स्वप्न समाजाच्या एकजुटीचे जळगावात साकार होणार भगवान परशुराम भवन!

September 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon