• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

अतिक्रमण, पार्किंग आणि अपूर्ण खड्ड्यांच्या कामांवरून बैठकीत तीव्र नाराजी

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेतील अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित राहिल्याच्या पार्श्वभूमीवर, महापौर दीपमाला काळे यांनी प्रमुख अधिकाऱ्यांची एक तातडीची आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत शहरातील विविध समस्यांवरून महापौरांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विशेषतः रिंग रोडची दुरवस्था, अतिक्रमण विषयावरून त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

रिंग रोडच्या कामावरून सार्वजनिक बांधकाम विभागावर कडक कारवाईचे संकेत
रिंग रोडवरील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत महापौरांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. “सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी (पीडब्ल्यूडी) या विषयाकडे गंभीरतेने पाहत नाहीत. बैठकीला बोलावले तरी ते येत नाहीत आणि फोनवर केवळ उडवाउडवीची उत्तरे देतात. रिंग रोडवर झालेल्या अनेक अपघातांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, तेथील नगरसेवकांना जनतेला उत्तरे देणे कठीण झाले आहे,” अशा शब्दांत महापौरांनी संताप व्यक्त करत, संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक भूमिका घेण्याचे निर्देश दिले.

अतिक्रमणावर वचक का नाही? पार्किंग लॉट उभारण्याच्या सूचना

शहरातील अतिक्रमणाचा आढावा घेताना महापौर म्हणाल्या, “एकदा अतिक्रमण उचलले की ते पुन्हा का होते? अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा वचक का नाही?” फेरीवाल्यांना पट्ट्या आखून देऊन किंवा पर्यायी जागा देऊन पुनर्वसन करण्याच्या कामात दिरंगाई का होत आहे, असा जाब त्यांनी विचारला. जळगावचे रस्ते मोकळे झालेच पाहिजेत, असे सांगतानाच शहरात झोनवाईज ‘पार्किंग लॉट’ उभारता येतील का, याची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अतिक्रमण विभागातील अपुऱ्या मनुष्यबळासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

कामचुकार जुन्या ठेकेदारांना डच्चू द्या!
“महापालिकेची कामे जे प्रामाणिकपणे आणि वेळेत पूर्ण करतील, त्यांनाच यापुढे कामे द्या. कामे रेंगाळत ठेवणाऱ्या जुन्या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करा आणि नवीन ठेकेदारांना संधी द्या,” असे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. यासोबतच शहरातील बेशिस्त रिक्षांना शिस्त लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

उत्पन्न वाढीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नवीन जागांचा शोध
मनपाच्या शहरातील पडीत असलेल्या जागा विकसित करून महापालिकेचा महसूल कसा वाढवता येईल, याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले.
साने गुरुजी ग्रंथालय: ग्रंथालयाजवळ सुरू असलेल्या बांधकामाची माहिती  दिली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या जागेचा विद्यार्थ्यांसाठी कसा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल, याची माहिती घेण्यास सांगितले.
चौक सुशोभीकरण व खड्डे: शहरातील खड्ड्यांची डागडुजी अद्याप अपूर्ण असल्याबद्दल आणि चौक सुशोभीकरणाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या विकासकांची माहिती गोळा करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड, धनश्री शिंदे, पंकज गोसावी, मुख्य वित्त व लेखा अधिकारी राजू लाकूडझोडे, शहर अभियंता योगेश बोरोले, नगर रचना विभागाचे अमोल पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


 

 

Tags: mahapor dipmala kale madam news
Previous Post

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

Next Post

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

तापी-पूर्णा खोऱ्यातील 'अभ्यासू नेतृत्व' विधानपरिषदेत पोहोचणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!
क्राईम

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

November 2, 2026
उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात
क्राईम

उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

November 2, 2026
विमा प्रतिनिधी पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी होणार मुलाखत
Uncategorized

जळगाव डाक विभागातर्फे दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभागीय पेन्शन अदालत

November 2, 2026
महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !
खान्देश

महामार्गावरील कचरा, ओपन स्पेसमधील वाहनांच्या अतिक्रमणांवरून दुकानदारांची चांगलीच कानउघाडणी !

November 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

जिल्ह्यात पुन्हा खून, चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला गळा आवळून संपवले..!

November 2, 2026
उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

उपविभागीय अधिकारीसह कनिष्ठ अभियंता १० हजारांच्या लाचेसह जाळ्यात

November 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon