रावेर तालुक्यातील बक्षीपूर येथे घटना; ६० हजार रुपये किमतीची अॅक्टिव्हा लंपास
रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बक्षीपूर येथे घरासमोर उभी केलेली अॅक्टिव्हा दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर पुंडलिक महाजन (वय ६५, रा. बक्षीपूर, ता. रावेर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. २९ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर उभी असलेली होंडा कंपनीची Activa 6G DLX (क्र. MH-19-DZ-1352) ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
चोरीस गेलेल्या दुचाकीची किंमत सुमारे ६० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी योगेश पाटील करीत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.









