उपचारादरम्यान धुळे येथील रुग्णालयात प्राणज्योत मालवली


मृत युवकाचे नाव रविंद्र जालम गायकवाड (वय १८, रा. भिलाटी, तरवाडे, ता. चाळीसगाव) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र हा शेळ्या चारण्यासाठी गावाजवळील शेत परिसरात गेला होता. यावेळी त्याने काही विषारी औषध सेवन केल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार २२ मे २०२६ रोजी त्याला धुळे येथे दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात उपचार सुरू असताना २५ मे २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी धुळे येथून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण सपकाळे करीत आहेत.









