• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा मोठा दणका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा मोठा दणका

एमआयडीसी, एरंडोल, पिंपळगाव हरेश्वर आणि धरणगाव पोलिसांची संयुक्त कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगाव l( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात अवैध गौणखनिज वाळू उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी गुरुवारी विविध ठिकाणी धडक कारवाया करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एमआयडीसी, एरंडोल, पिंपळगाव हरेश्वर आणि धरणगाव पोलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित वाहनांसह वाळू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

एमआयडीसी पोलिसांची डंपरसह वाळू जप्त

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरनं ४४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेव वाडी ते वावडदा दरम्यान सार्वजनिक ठिकाणी गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत ज्ञानेश्वर साळुंखे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुकेश शिवदास सोडे (वय ४०, रा. वाघनगर, जळगाव) हा डंपर क्रमांक एमएच १९ सीवाय ४४३९ मध्ये विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी सुमारे १० हजार रुपये किंमतीची ५ ब्रास वाळू तसेच ८ लाख रुपये किंमतीचा डंपर असा एकूण ८ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणाचा तपास पोहेका समाधान टहाकळे करीत आहेत.

एरंडोल येथे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह वाळू जप्त

एरंडोल पोलीस ठाण्यात गुरनं ९७/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२), ३(५) सह गौण खनिज विकास व विनियमन अधिनियम तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडके बु।। ते खर्ची रोडवरील जय मल्हार वॉटर सप्लायसमोर गुरुवारी सकाळी ११.१० वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल नथ्थु कोळी यांनी कारवाई केली. यावेळी एक निळ्या रंगाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर (एमएच १९ बीजी ५५९०) व ट्रॉलीतून अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सुमारे दीड ब्रास वाळूसह ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक सुनिल भास्कर मोरे आणि मालक भिमराज त्र्यंबक कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव हरेश्वर येथे १० लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुरनं २५०/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२) तसेच मोटार वाहन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोजे गावाबाहेर पिंपळगाव हरेश्वर रोडवर गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी टाटा कंपनीचा डंपर (एमएच २० सीटी ६८२९) अडवून तपासणी केली. यावेळी अंदाजे ४ ब्रास अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी १० लाख रुपये किंमतीचा डंपर आणि २० हजार रुपये किंमतीची वाळू असा एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चालक अतुल मदनसिंग परदेशी आणि शुभम गुजर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव पोलिसांचीही कारवाई

धरणगाव पोलीस ठाण्यात गुरनं २०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) सह खाण आणि खनिज अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतखेडा फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ ईव्ही १६५२ च्या ट्रॉलीतून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड केले. पोलिस कॉन्स्टेबल विनोद उत्तम चौधरी यांच्या फिर्यादीवरून प्रेमराज जिजाबराव पाटील (रा. वाकटुकी, ता. धरणगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे दीड ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून पुढील तपास पोना जितेंद्र भदाणे करीत आहेत.

आरोपींना अद्याप अटक नाही

चारही प्रकरणांमध्ये संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अवैध वाळू वाहतुकीविरोधातील कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.


 

 

Tags: jilhyat-avaidh-valu-vahtuk karvai
Previous Post

पाळधी रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची मागणी

Next Post

चाळीसगाव तालुक्यात विषारी औषध प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बाहेर जाऊन विषप्राशन करीत आला घरी, उपचारादरम्यान तरुणाचे निधन !

चाळीसगाव तालुक्यात विषारी औषध प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
1xbet russia

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या
1xbet russia

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा
1xbet russia

गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

August 31, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

August 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड! दोन सख्ख्या भावांना बेड्या

August 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon