१८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी; ६३० सदस्य बजावणार मतदानाचा हक्क
जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ संदर्भात भारत निवडणूक आयोगाने अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून जळगाव जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.
२५ मेपासून नामनिर्देशन प्रक्रिया
निवडणूक कार्यक्रमानुसार २५ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २ जून ठेवण्यात आली असून ३ जून रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ६ जून असेल.
१८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार असून २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. नामनिर्देशन पत्रे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान स्वीकारण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात ७ मतदान केंद्रांची व्यवस्था
या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यात एकूण ७ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. मतपत्रिकेद्वारे मतदान होणार असून मतदारांना पसंतीक्रमानुसार मतदान करता येणार आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. मतदान व मतमोजणी केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
६३० सदस्य बजावणार मतदानाचा अधिकार
या निवडणुकीत जळगाव महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील १५ नगर परिषद आणि ४ नगरपंचायतींतील निवडून आलेले व स्वीकृत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण ६३० सदस्य या निवडणुकीत मतदार म्हणून सहभागी होणार आहेत.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोहन घुगे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना मोरे काम पाहणार आहेत.
जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी केंद्र आणि सुरक्षा कक्ष जिल्हास्तरावर प्रस्तावित करण्यात आले आहेत.
आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेवर परवानगीशिवाय पोस्टर्स, बॅनर, झेंडे लावणे किंवा घोषणाबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.