पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील घटना
पाचोरा (प्रतिनिधी):- पाचोरा तालुक्यातील अतुली खुर्द येथे १८ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.


नाजिया शमशोद्दीन पिंजारी (वय १८, रा. अतुली खुर्द, ता. पाचोरा) असे मृत तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाजियाने घरातील मागील खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.









