मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी):-मुक्ताईनगर तालुक्यात ट्रेलरवरील लोखंडी पाइप उतरविताना पाय घसरून पडल्याने एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजकुमार साह (वय ४१, रा. फुलपरिया महुआ, जि. वैशाली, बिहार) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलरवरील लोखंडी पाइप उतरविण्याचे काम सुरू असताना राजकुमार साह यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकाॅ. चंद्रकांत बोदडे करीत आहेत.









