अकलूद गावातील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
यावल (प्रतिनिधी):- यावल तालुक्यातील अकलूद येथे घरासमोर उभी असलेली बुलेट चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन ज्ञानेश्वर कोळी (वय ३०, रा. सांगवे पोस्ट विटवा, ता. रावेर) हे अकलूद येथील हनुमान मंदिराजवळ वास्तव्यास आहेत. त्यांनी आपली ‘हंटर 350’ बुलेट (क्रमांक MH 19 EW 3875) घराच्या कंपाउंडमध्ये उभी केली होती.
दि. ७ मे २०२६ रोजी रात्री २ वाजेपासून ते ८ मे रोजी सकाळी ६.३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. चोरीस गेलेल्या बुलेटची किंमत सुमारे २ लाख २९ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
याप्रकरणी पवन कोळी यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका विकास सोनवणे करीत आहेत.