डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात बैठक
जळगाव प्रतिनिधी) :- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅन्टी रॅगींग कमिटीच्या पदाधिकार्यांनी चक्क थेट मेस अर्थात भोजनालयात जाऊन बैठक घेत विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी मेसमधील वातावरण कसे असावे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅन्टी रॅगींग कमिटीची बैठक अध्यक्ष तथा डीन डॉ. प्रशांत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या मेसमध्ये अर्थात अन्नपुर्णालयम येथे बुधवारी (६मे) घेण्यात आली. या बैठकीला वैद्यकिय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, नशिराबाद पोलिस विभागाचे अतुल महाजन, डॉ. प्रेमचंद पंडीत, ज्योत्स्ना भिरूड, अर्चना भिरूड, सुरेंद्र गावंडे, चेतन साखरे, ललित बोंडे, उपस्थित होते. या बैठकीदरम्यान मेसमध्ये भोजनासाठी येणार्या विद्यार्थ्यांना कमिटीच्या सदस्यांनी मार्गदर्शन केले. तसेच यावेळी कमिटीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांसमवेतच भोजन घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर संबंधितांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. मेसमध्ये घेण्यात आलेली अॅन्टी रॅगींग कमिटीची बैठक ही महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम ठरली.










