जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात कार्यवाही
जळगाव (प्रतिनिधी):- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या एकूण ३९ उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांचे समुपदेशन पद्धतीने इतर शाळांमध्ये समायोजन करण्यात आले.

हे समुपदेशन गुरुवार, दि. ३० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी संबंधित शिक्षकांना तालुकानिहाय रिक्त पदांची माहिती सादर करण्यात आली व त्यांच्या पसंतीनुसार पदस्थापना देण्यात आली.
या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षकांची उपलब्धता संतुलित होऊन शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.
यावेळी शिक्षण अधिकारी निलेश पाटील, उपशिक्षण अधिकारी विजय सरोदे, नरेंद्र चौधरी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.









