जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आग्नेय बॅचतर्फे आयोजित समन्वय २०२६ सप्ताहांतर्गत आज फॅशन शोच्या माध्यमातून पौराणिक कथेतील देवताचे आगमन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार साकारले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे १२ ते १८ एप्रिल या कालावधीत समन्वय २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
१२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीने शुभारंभ करण्यात आला. आज दि १५ रोजी फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य हदयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर,वैद्यकीय अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके,वैद्यकिय अधिक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड,डॉ.उल्हास पाटील होमीओपॅथीक रूग्णालय व महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. पंकज शर्मा,डॉ. वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयाच्या प्राचार्य कविता देशमुख, आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच धन्वंतरी पूजन आणि स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.या फॅशन शो मध्ये २२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. परिक्षक म्हणून अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,डॉ. वर्षा पाटील होम सायन्स महाविद्यालयाच्या प्राचार्य कविता देशमुख यांनी परिक्षक म्हणून काम पाहीले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर्स उपस्थित होते.सुत्रसंचालन पायल पाटील सतप्रित कोकाटे यशस्वीतेसाठी चैतन्य पाटील, परीक्षित प्रजापती, प्रज्ञा दुधमल,विशाखा काजरखाने यांनी परिश्रम घेतले.
असे होते सहभागी स्पर्धक व देवता अवतार
१. मंदार कुकुलवार — मत्स्य २. स्वराज सूर्य – कूर्म ३. वैष्णवी देशमुख – मोहिनी ४. अमित पाटील – वराह ५. विशाखा ६. विशाखा पाटील – कजरखाने नरसिंह ७.सार्थक मडके — राजा हिरण्यकश्यपू ८. कृषिव जेठवा – प्रल्हाद ९.स्वरूप कालेकर – वामन १०. कृष्णा गायगोळ – राजा बळी ११.भुवन चव्हाण – २ रा. भुवन चव्हाण – राम १३. अमित शिंदे – लक्ष्मण १४. संस्कृती पाटील – सीता १५. अर्पित पाटील – कृष्णा १६. अमन चौहान कालिया नाग १७. माही गडपायले – राधा १९ समृद्धी मुत्तेपवार- असुर २०. अपूर्व पाटील – असुर २१. मिहीर पाटील – विष्णू