गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात एआय प्रोटोटाईप डेमो डे उपक्रमाचे विजेते
जळगाव (प्रतिनिधी):- गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय,जळगाव मधील कृत्रिम बुद्धिमत्ता व डेटा सायन्स अभियांत्रिकी विभागातर्फे एआय प्रोटोटाईप डेमो डे पार पडला. हा कार्यक्रम संस्थेच्या इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमामध्ये तृतीय वर्ष एआयडीएस शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकल्प सादर करून त्यांच्या कल्पकतेची आणि तांत्रिक कौशल्यांची झलक दाखवली. विशेषतः काही प्रकल्पांनी वास्तविक जीवनातील समस्यांवर प्रभावी उपाय सुचवले.प्रथम क्रमांकावर सत्यम महाजन यांनी सादर केलेला एआय बेस स्मार्ट व्होटींग सिस्टीम हा प्रकल्प विशेष आकर्षण ठरला. या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मतदान प्रक्रिया अधिक सुरक्षित, जलद आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये फेस रिकग्निशन किंवा ओटीपीद्वारे मतदारांची ओळख पटवणे, डुप्लिकेट किंवा बनावट मतदान रोखणे, तसेच रिअल-टाइम नालिटिक्स आणि निकालांचे अचूक अंदाज देण्याची सुविधा देण्यात आली आहे.द्वितीय क्रमांकावरील प्रकल्प हर्षा धांडे, मिनाज पिंजारी, तरन्नुम पिंजारी आणि एफ़ाज खाटीक यांनी सादर केलेला एआय न्युज अॅप्लीकेशन होता. या अॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे ताज्या आणि विश्वसनीय बातम्या एआयच्या मदतीने फिल्टर करून दिल्या जातात. यामुळे वेळेची बचत होऊन अधिक अचूक आणि संबंधित माहिती मिळते.तृतीय क्रमांकावरील प्रकल्प आकाश जाधव आणि तेजस जाधव यांनी सादर केलेला एआय बेस रिझुम स्क्रिनिंग सिस्टीम होता. यप्रणालीद्वारे कंपन्यांना मोठ्या प्रमाणातील रिझ्युम मधून योग्य उमेदवारांची निवड जलद आणि अचूकपणे करता येते.

एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उमेदवारांच्या कौशल्यांचे विश्लेषण करून योग्य जॉब मॅचिंग करण्यात मदत होते.इतर विद्यार्थ्यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले.या सर्व प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे तर वास्तविक जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता देखील प्रभावीपणे दाखवून दिली. कार्यक्रमात सादर झालेल्या प्रकल्पांचे प्राध्यापक व तज्ज्ञांनी कौतुक केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांचे सहकार्य तसेच मार्गदर्शन लाभले. विभागप्रमुख डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांनी कार्यक्रमास सहकार्य केले. कार्यक्रमाचे समन्वयक तसेच मार्गदर्शक प्रा. जयश्री पाटील असून, प्रा. रेश्मा अत्तरदे, प्रा. सेजल गुजराथी आणि प्रा. दिशा साळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशस्वी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची भावना अधिक दृढ झाली असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे समाजोपयोगी तंत्रज्ञान विकासाला चालना मिळणार आहे.सदर उपक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील सर यांनी कौतुक केले.