पक्ष नेतृत्वाकडून मोठी जबाबदारी
जळगाव (प्रतिनिधी) :- शिवसेना (एकनाथ शिंदे गट) प्रणित श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक विस्तार करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर, राहुल अरुण सांगळे यांची ‘शिवसेना श्रमिक राष्ट्रीय सफाई कामगार सेना’ च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे. राहुल सांगळे यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले असून, त्यांचा कार्यकाळ एक वर्षाचा असणार आहे.
कामगारांच्या हितासाठी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने कार्य करण्याची अपेक्षा पक्ष नेतृत्वाने व्यक्त केली आहे. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण घराघरात पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगळे यांनी म्हटले आहे.
या निवडीबद्दल त्यांचे राजकीय आणि सामाजिक स्तरावरून अभिनंदन होत आहे. या नियुक्ती पत्रावर प्रदेश सचिव अमित आर. भटनागर आणि संपर्क प्रमुख जितेंद्र जैन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.








