• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांवर लाठी खाण्याची वेळ :  नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी जखमी, परिसरात तणाव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांवर लाठी खाण्याची वेळ :  नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी जखमी, परिसरात तणाव

भडगाव शेतकरी संघाचा भोंगळ कारभार; गोंधळामुळे टोकन प्रक्रिया रद्द

भडगाव प्रतिनिधी):- येथील शेतकरी सहकारी संघाच्या प्रांगणात शासकीय हमीभाव ज्वारी खरेदी नोंदणी प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला. नियोजनाचा अभाव आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे मंगळवारी सकाळपासूनच शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागल्याने आणि चेंगराचेंगरीत काही शेतकरी जखमी झाल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अखेर, वाटप केलेली टोकन रद्द करून नोंदणी प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

सोमवारपासूनच शेतकऱ्यांचा मुक्काम
रब्बी हंगाम २०२५-२६ साठी ज्वारी नोंदणी सुरू होणार असल्याची चर्चा २४ तास आधीच पसरली होती. लेखी आदेश नसल्याचे सांगत सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली, मात्र सोमवारी उशिरा आदेश प्राप्त झाल्यानंतर मंगळवारी सकाळी टोकन वाटप जाहीर करण्यात आले. याचा सुगावा लागताच तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी सोमवार रात्रीपासूनच संघ परिसरात गर्दी केली होती.

नियोजनाचा फज्जा आणि चेंगराचेंगरी
मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत नोंदणी कशी करायची, यावर केवळ चर्चाच सुरू होती. वाढती गर्दी पाहता शेतकरी संघाने केलेली मंडप आणि पाण्याची सोय तोकडी पडली. तीन ते चार वेळा रांगा आणि टोकन देण्याच्या पद्धती बदलण्यात आल्या. अखेर १ ते १००० क्रमांकाचे टोकन लकी ड्रॉ पद्धतीने देण्याचे ठरले, मात्र प्रक्रिया सुरू होताच गर्दी अनियंत्रित झाली.

धक्काबुक्कीत एक शेतकरी खाली पडला, तर मंडप कोसळून एका शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गर्दी इतकी प्रचंड होती की परिस्थिती हाताबाहेर गेली. गोंधळ थांबवण्यासाठी पोलिसांनी ‘खाकी’चा इंगा दाखवत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, नोंदणीसाठी त्यांना लाठ्या खाव्या लागल्या. मात्र, प्रभारी पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी स्पष्ट केले की, “गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला असला तरी, तो लाठीमार नव्हता.”

प्रशासनाचा पवित्रा : सर्व टोकन रद्द
गोंधळाचा फायदा घेत काही अज्ञात लोकांनी टोकन पळवल्याचे किंवा गहाळ झाल्याचे शेतकरी संघाने सांगितले आहे. यामुळे आतापर्यंत वाटप केलेली सर्व टोकन रद्द करण्यात आली आहेत. नवीन नोंदणीची तारीख वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन मिळाल्यानंतरच जाहीर केली जाईल, असे संघाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

“नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता हवी असेल तर ती ऑफलाइन न ठेवता पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवावी, जेणेकरून शेतकऱ्यांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागणार नाही आणि अशा दुर्घटना टळतील.”

Tags: javari nondisathi shetkaryvar lathi khanyachi vel
Previous Post

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर

Next Post

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

'जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग'च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026
ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांवर लाठी खाण्याची वेळ :  नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी जखमी, परिसरात तणाव
1xbet russia

ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांवर लाठी खाण्याची वेळ :  नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी जखमी, परिसरात तणाव

April 7, 2026
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर
1xbet russia

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करिश्मा नायर

April 7, 2026
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथे अंत्यविधीला विरोध

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026
ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांवर लाठी खाण्याची वेळ :  नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी जखमी, परिसरात तणाव

ज्वारी नोंदणीसाठी शेतकऱ्यांवर लाठी खाण्याची वेळ :  नियोजनाच्या अभावामुळे शेतकरी जखमी, परिसरात तणाव

April 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!