• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

मानसोपचार विभागातील टीमचे यश,तंत्रज्ञानामूळे १५ दिवसात लक्षणीय सुधारणा

जळगाव (प्रतिनिधी):- मानसिक आजारामुळे त्रस्त असलेल्या २६ वर्षीय तरुणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात आधुनिक ईसीटी  तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वी उपचार करण्यात आले असून केवळ १५ दिवसांत त्याची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली आहे. अनेक वर्षे मानसिक त्रास सहन करणार्‍या या तरुणाला पुन्हा सामान्य आयुष्याकडे परतण्याची आशा निर्माण झाली आहे.
रावेर तालुक्यातील मयूर नामक २६ वर्षीय तरुणाला मागील सुमारे पाच वर्षांपासून मानसिक आजाराची लक्षणे जाणवत होती. त्याला सतत चिडचिड होणे, कोणावर तरी संशय घेणे, अनावश्यक भीती वाटणे, घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करणे तसेच एकटे राहण्याची सवय लागणे अशी अनेक लक्षणे होती. कालांतराने त्याची अवस्था अधिक गंभीर होत गेली. कुटुंबीयांनी त्याच्यावर विविध ठिकाणी उपचार केले, अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला. मात्र अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता.

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचार
अखेरीस कुटुंबीयांनी जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात त्याला दाखल केले. येथे मानसिक आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णाची सखोल तपासणी करून त्याच्या आजाराचे स्वरूप समजून घेतले. औषधोपचारांसह आधुनिक ईसीटी उपचार पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ईसीटी ही गंभीर मानसिक आजारांमध्ये वापरली जाणारी आधुनिक व प्रभावी उपचार पद्धती असून अत्यंत सुरक्षित पद्धतीने दिली जाते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि आवश्यक वैद्यकीय काळजी घेत ही प्रक्रिया पार पडते. रुग्णाला भूल देऊन नियंत्रित पद्धतीने उपचार दिले जातात, त्यामुळे रुग्णाला कोणताही त्रास होत नाही. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणावर ईसीटीचे काही सत्रे घेण्यात आली. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला. केवळ १५ दिवसांत त्याच्या वागणुकीत सकारात्मक बदल दिसू लागले. चिडचिड कमी झाली, भीती व संशय कमी झाले तसेच तो कुटुंबीयांशी संवाद साधू लागला. आता त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा खूप सुधारली असून तो सामान्य जीवनाकडे परतत आहे.

मानसिक आजारांमध्ये योग्य वेळी उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक वेळा रुग्ण आणि कुटुंबीय समाजातील गैरसमजामुळे उपचार घेण्यास उशीर करतात. आधुनिक वैद्यकीय पद्धतींमुळे अनेक मानसिक आजारांवर प्रभावी उपचार शक्य आहेत. ईसीटी ही सुरक्षित व परिणामकारक पद्धत असून गंभीर मानसिक आजारांमध्ये ती अत्यंत उपयुक्त ठरते.
– डॉ. देवांश गणात्रा, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

Next Post

जळगावात दुचाकी लावण्याच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार

जळगावात दुचाकी लावण्याच्या वादातून तरुणावर खुनी हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या
1xbet russia

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

August 27, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला
1xbet russia

हृदयविकाराच्या झटक्याने ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

August 26, 2026
८३ वर्षीय वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी
1xbet russia

८३ वर्षीय वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

August 26, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

टाकरखेडा हादरले ! एकाच कुटुंबातील चौघांची रेल्वेखाली आत्महत्या

August 27, 2026
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

हृदयविकाराच्या झटक्याने ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

August 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon