मलकापूरच्या ६५ वर्षीय वृध्दावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून यशस्वी एन्जीओप्लास्टी
जळगाव (प्रतिनिधी):- दुपारच्या सुमारास अचानक छातीत दुखणार्या रूग्णाला रात्रीच्या समयी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात हलविण्यात आले. रूग्णाची परीस्थिती बघता डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा गतीमान झाली आणि अवघ्या तासाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून एन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वी ठरून रूग्णाचे प्राण वाचले.
याबाबत माहिती अशी की, मलकापूर येथील ६५ वर्षीय रूग्ण शेतीकाम करतात. दि. २६ रोजी त्यांना दुपारी अचानक छातीत दुखू लागले होते. हा त्रास वाढल्यानंतर त्यांनी स्थानिक ठिकाणी दाखविले. मात्र स्थानिक डॉक्टरांनी त्यांना जळगावला नेण्याचा सल्ला दिला. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या आपात्कालीन विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रूग्णाची परीस्थिती लक्षात घेता तातडीने हृदयालयात रूग्णाला भरती करून त्यांची टुडी इको आणि एन्जीओग्राफीची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मुख्य रक्तवाहिनी ९५ टक्के ब्लॉक होती. अशा वेळी नातेवाईकांशी सल्ला मसलत केल्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मनमिता रेड्डी, डॉ. झिशान सय्यद, डॉ. सिध्देश्वर खांडे, डॉ. हर्ष पटेल, डॉ. सई पाटील या टीमने रूग्णावर एन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर काही तासांनी रूग्णाची प्रकृती स्थिर झाल्याने शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. विशेष म्हणजे रूग्णावरील संपूर्ण उपचार हे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी रूग्णालयातील हृदयालयाच्या सहकार्यांनी मदत केली.

तासाभराच्या यंत्रणेने वाचवले प्राण
मलकापूर येथील रूग्णाला हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येताच डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा गतीमान झाली. प्राथमिक तपासणी ते शस्त्रक्रियेपर्यंतचा प्रक्रिया अवघ्या तासाभरात झाल्याने रूग्णाचे प्राण वाचल्याची माहिती हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांनी दिली. दरम्यान हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी सर्व यंत्रणा राबल्याने रूग्णाच्या कुटुंबियांनी डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे ऋण व्यक्त केले.