गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्व. गोदावरी आजींना अभिवादन
जळगाव (प्रतिनिधी):- आपल्या प्रभावी व विचारप्रवर्तक भाषणात गोदावरी आजींच्या प्रारंभीच्या कठीण परिस्थितीचे स्मरण करून दिले. अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून त्यांनी उभारलेले कार्य हे खरोखरच प्रेरणादायी असून, त्यांनी केलेली समाजसेवा ही प्रत्येकासाठी आदर्शवत आहे, असे त्यांनी सांगितले. कौटुंबिक जबाबदार्या सांभाळत समाज उभारणीसाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गरजू व्यक्तींना मदत करणे हीच आजींची खरी शिकवण असून ती प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारावी, असा मोलाचा संदेश गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी दिला.


गोदावरी फाऊंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे संस्थेच्या प्रेरणास्थान, श्रद्धेय गोदावरी वासुदेव पाटील (आजी) यांची जयंती बुधवारी अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिभावपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक व कर्मचार्यांनी आजींच्या कार्याचा स्मरण करत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी गोदावरी आजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांनी गोदावरी आजींच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा वेध घेत, त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभा केलेला सामाजिक व शैक्षणिक वारसा अधोरेखित केला. त्यांच्या कार्यातून समाजसेवेची खरी प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले. यानंतर डॉ. सरोज भोळे यांनी गोदावरी आजींनी राबवलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांच्या कष्टाळूपणा, चिकाटी आणि दूरदृष्टीमुळेच आज संस्था उंच शिखरावर पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. प्रवीण सोनवणे यांनी गोदावरी फाऊंडेशनच्या कार्याचा संदर्भ देत आजींच्या कार्याची व्यापकता व समाजातील प्रभाव यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी गोदावरी आजींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी यांनी केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील यांनी आदरांजली अर्पण केली.
यासह गोदावरी इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट,डॉ.वर्षा पाटील वुमेन्स महाविद्यालय,गोदावरी इग्लिश स्कुल जळगाव, डॉ.उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालय, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय,डॉ.उल्हास पाटील होमीओपॅथीक महाविद्यालय व रूग्णालय, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदीक महाविद्यालय व रूग्णालय, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपी महाविद्यालय,डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालय,डॉ. उल्हास पाटील कृषि व तंत्रज्ञान महाविद्यालय,डॉ. उल्हास पाटील अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय,गोदावरी संगीत महाविद्यालय येथे आदरांजली वाहण्यात आली.









