• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

२० वर्षीय तरुणीच्या मणक्यावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

जळगाव ( प्रतिनिधी ) – मोबाईलवर बोलत असताना पहिल्या मजल्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय तरुणीच्या मणक्यावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करून तिचे चालणे पुन्हा शक्य करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. ही यशस्वी शस्त्रक्रिया जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालय येथे मेंदू व मणका विकार तज्ज्ञांच्या टीमने केली.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील आफरीन तडवी ही २० वर्षीय तरुणी आपल्या घरी मोबाईलवर बोलत असताना अचानक तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली. या अपघातात तिच्या मणक्याला जबर दुखापत झाली. पडताना झालेल्या गंभीर आघातामुळे तिच्या पायांची ताकद अचानक कमी झाली आणि ती उभी राहू शकत नव्हती. कुटुंबीयांनी तातडीने तिला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालय येथे दाखल केले.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी तिची सखोल तपासणी केली. प्राथमिक तपासणीनंतर तिला तातडीने एमआरआयसह विविध अत्याधुनिक तपासण्या करण्यात आल्या. एमआरआय अहवालातून तिच्या मणक्याच्या कंबरेजवळील भागात गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. मणक्याच्या एल-२ आणि एल-३ (ङ२-ङ३) या मणक्यांमध्ये गंभीर दुखापत झाल्याने मज्जातंतूंवर दबाव निर्माण झाला होता. यामुळेच तिच्या पायातील ताकद कमी झाली होती.रुग्णाची स्थिती लक्षात घेता त्वरित शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचा निर्णय डॉ. विपुल राठोड यांनी घेतला. त्यानुसार तरुणीवर एल२-एल३ लॅमिनोक्टोमी अ‍ॅन्ड एल२ टू एल४ पेडीकल स्क्रु फिक्सेशन या अत्यंत नाजूक आणि कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. या शस्त्रक्रियेद्वारे मणक्यावरील दबाव कमी करून तुटलेल्या मणक्याला स्क्रु आणि रॉडच्या सहाय्याने स्थिर करण्यात आले. ही शस्त्रक्रिया डॉ. विपुल राठोड, डॉ. अतुल जाधव, डॉ. प्रितम दास, डॉ. श्रृती खंडागळे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे या टीमने अत्यंत यशस्वीरीत्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर तरुणीवर अतिदक्षता विभागात विशेष लक्ष ठेवण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांमुळे आणि योग्य फिजिओथेरपीमुळे अवघ्या आठवडाभरात तिच्या पायातील ताकद हळूहळू परत येऊ लागली. काही दिवसांतच ती स्वतःच्या पायावर उभी राहू लागली आणि चालण्यासही सक्षम झाली. या यशस्वी उपचारामुळे रुग्ण आणि तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.या संपूर्ण उपचाराचा खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत करण्यात आल्याने रुग्णाला उपचार पूर्णपणे मोफत मिळाले. आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबासाठी ही योजना मोठा दिलासा ठरली.

मणक्याच्या दुखापतीत वेळेवर योग्य निदान आणि तातडीची शस्त्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. या रुग्णाच्या बाबतीतही वेळेत उपचार मिळाल्यामुळे मज्जातंतूंवरील दबाव कमी करण्यात यश आले आणि तिच्या पायाची ताकद पुन्हा पूर्ववत होऊ शकली. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास अशा दुखापतीत कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका असतो.

– डॉ. प्रितम दास, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय. 

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

Next Post

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार - डॉ. एन एस आर्विकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
1xbet russia

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली
1xbet russia

एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांची वसुली

March 16, 2026
मोबाईलवर बोलतांना पडून मणक्याला गंभीर दुखापत चालणे झाले होते बंद
1xbet russia

 जळगाव जिल्हयास तिरळेपणा मुक्त  करणार – डॉ. एन एस आर्विकर

March 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महापौरांचे प्रशासनाला पत्र : जळगाव मनपा स्वीकृत सदस्य नियुक्तीला मुदतवाढ

March 16, 2026
गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

गुढीपाडव्यापासून श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ, शेंदुर्णीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

March 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon