भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचा उपक्रम
रत्नागिरी ;-कोकणात केळशी गावात आत्या आवश्यक वस्तूचे गरजू दोनशे कुटुबांना मदतीचा हात चक्री वादळाचा तडाखा बसल्याने भारतीय वाहन खरेदी विक्री संघना अध्यक्ष आरिफ खान यांनी संघटनेचे विभाग प्रमुख रिजवान लंबाडे यांच्याशी संपर्क करून ताबडतोब केळशी गावातील माहिती फोन करून घेतली . तसेच रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रविण वाटेकर हे केळशी गवात राहत असल्यामुळे तेथील परीस्थितीची होती .बऱ्याच घरांचे पत्रे उडाले घरावर झाड पडली विजेचे खांब पडले मोबाइल टॉवर पडले गावातील संपर्क तुटला आहे . रत्नागिरी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे हजारो नागरिकांची घरे उध्वस्थ झाली होती . त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडल्याने त्यांच्यावर आर्थिक बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने सामाजिक बांधिलकीतून भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांच्या पुढाकाराने उध्वस्थ झालेल्या कुटुंबियांच्या संसाराला हातभार लागावा या निस्वार्थ भावनेने विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले .
यावेळी प्रत्येक कुटुंबियांच्या सदस्यांना संसार उध्वस्थ झाल्याचे दुःख त्यांना जाणवत असताना देखील भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या या उपक्रमाचे त्यांनी आभार व्यक्त करीत समाधानाचे हास्य चेहर्यावर दिसून आले . भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या पुर्ण महाराष्ट्रात कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केळशी गावातील गरजुंपर्यंत मदत पोहचवण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांचे मार्गदर्शना खाली संघटनेचे उपाध्यक्ष विनायक तारु तसेच महासचिव विजय ओहोळ , विजय पवार गवारे ,शुभम जाधव , कोकण विभाग प्रमुख रिजवान लांबांडे , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रवीण वाटेकर यांनी मोलाचं कष्ट घेऊन मदत प्रत्येक गरजु कुटुंबां पर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले.
भारतीय वाहन संघटनेने निसर्ग चक्रीवादळात उध्वस्थ झालेल्या कुटुंबियांना गव्हाचे पीठ , माचीस बॉक्स , मच्छर अगरबत्ती , एलईडी बॅटरी , मेणबत्ती या अत्यावश्यक वस्तूंचे वाटप ११० कुटुंबियांना यांचे वाटप करण्यात आले.
या गावांना केली वस्तूंचे वाटप
रत्नागिरी जिल्ह्यातील ,दापोली , केलशी , आदी गावांमध्ये भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या तसेच राज्यातील भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या सर्व सभासदांनी आर्थिक स्वरूपाची मदत करण्याचा हातभार लावला आहे . त्यामुळे संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. काहीक्षण समाजासाठी काहीक्षण देशासाठी या संघनेच्या ब्रिदवाक्यानुसार भविष्यातही अशा स्वरूपाचे उपक्रम ,मदतीचा देण्यात येणार असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांनी सांगितले .