जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 75 नवीन रूग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्या आता 1590 वर आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
शासनाच्या आदेशानुसार आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार आज
जळगाव 6, जळगाव ग्रामीण 7, एरंडोल 1, भुसावळ 2, जामनेर 1, रावेर 5, अमळनेर 4, पारोळा 6, यावल 17, बोदवड, धरणगाव 6, चोपडा 16, भडगाव 3, मुक्ताईनगर 1 या रूग्णांचा समावेश आहे.