जळगावला भोईटेनगर रेल्वे गेट परिसरात घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – बंद असलेल्या दूध केंद्राला आग लागून त्यातील पाच फ्रीजसह जवळपास पाच लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास भोईटेनगर रेल्वे गेट परिसरातील आनंदनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळ घडली. मनपाच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवले.

शहरातील भोईटेनगर रेल्वे गेट परिसरात विशाल अरुण मंडोरे यांचे विकास दुधाचे केंद्र आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, रात्री १२ वाजेच्या सुमारास अचानक दुकानास आग लागली. क्षणात आगीचा मोठा भडका उडाला व त्यात पाच फ्रीज, विक्रीसाठीचे खाद्य पदार्थ, दूध, दुग्धजन्य पदार्थ व इतर सर्व साहित्य तसेच दुकानात असलेले काही पैसे जळून खाक झाले. आगीचे मोठे लोळ व धुराचे लोट यामुळे परिसरात खळबळ उडाली.









