• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत मुदत, त्यानंतर २५ हजारांचा दंड अन् प्रसंगी गुन्हे होणार दाखल !

प्लास्टिकमुक्त जळगावसाठी मनपा आक्रमक ; महापौर, उपमहापौरांचा कडक इशारा

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहराला प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांची तातडीची बैठक घेऊन १ मार्चपर्यंत प्लास्टिक विक्री थांबविण्यासाठी अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतरही प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि प्रसंगी गरज पडली तर गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे.


महापौर दालनात सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी ही महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, सहायक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील, वरिष्ठ आरोग्य अधीक्षक रमेश कांबळे,  प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष कमल शामनानी व धनराज चावला, डॉ. लीना पाटील यांच्यासह ‘माझे शहर माझी जबाबदारी’ ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले की, प्लास्टिकमुळे कॅन्सर, दमा यांसारख्या गंभीर आजारांचे रुग्ण वाढत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. गाईंच्या पोटात प्लास्टिक आढळत असल्याच्या घटना हृदयद्रावक आहेत. त्यामुळे विनंतीवजा आवाहन करण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, १ मार्चपर्यंत व्यापाऱ्यांना आपला माल हटवण्यासाठी मुदत देत आहे. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट ‘कडक’ कारवाई केली जाईल. प्लास्टिक ऐवजी कंपोस्टेबल बॅग्स व कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन करत आहोत. विशेषतः महिला बचत गटांकडून कापडी पिशव्या घेतल्यास त्यांना रोजगारही उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. लीना पाटील यांनी पर्यावरणपूरक थैली व इतर साहित्य वापरणेविषयी माहिती दिली.

शहरात कोणी प्लास्टिक विकत असेल, तर नागरिक थेट महापौर किंवा उपमहापौरांशी संपर्क साधून तक्रार करू शकतात, असेही महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले. व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि प्लास्टिक निर्मूलनासाठी चर्चेला बोलावणारे हे पहिलेच महापौर असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यापाऱ्यांनी दिली. प्रशासनाचा पहिला टप्पा हा सिंगल युज प्लास्टिक (कॅरिबॅग) बंद करण्यावर असेल. १५ मार्चनंतर पुन्हा एकदा आढावा बैठक घेतली जाणार आहे.

“जळगावच्या नागरिकांच्या हितासाठी आणि भविष्यातील भीषण समस्या टाळण्यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत. लोकांना प्लास्टिकची पिशवी मागण्याची व घेण्याची लागलेली चुकीची सवय आपल्याला मोडावी लागेल. ही पहिली सामंजस्यपूर्वक सूचना आहे, यानंतर थेट कारवाई होईल.”
— दीपमाला काळे, महापौर.


 

 

Tags: #jalgaon manpa newsplastik vikretyana 1 march mudat
Previous Post

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

Next Post

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

महिला व बालकल्याण आणि स्थायी समितीच्या माध्यमातून जळगावचा शाश्वत विकास साधणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 
1xbet russia

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

धरणगावात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालकाने निष्काळजीपणे ट्रक मागे घेत ७५ वर्षीय वृद्धाला चिरडले

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon