जळगाव ( प्रतिनिधी ) – गोदावरी संस्थेचे अध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोदावरी संस्थेतील विविध परिसंस्थांमधील कर्मचार्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. उल्हास पाटील इग्लिश मिडीयम सीबीएसई स्कुल सावदा विजेता ठरला.

यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष होते. एकूण १६ सामने अत्यंत उत्साहात पार पडले, त्यात डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा, गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल जळगाव, गोदावरी अॅग्री कॉलेज, गोदावरी लॉ कॉलेज, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, डॉ. वर्षा पाटील बीसीए या संघांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेत सेमी फायनल डॉ. वर्षा पाटील बीसीए आणि डॉ. उल्हास पाटील मेडिकल यांच्यात झाला, तर दुसरा सेमी फायनल डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा विरुद्ध गोदावरी सीबीएससी जळगाव यांच्यात झाला. तर अंतिम सामन्यात डॉ उल्हास पाटील सीबीएसई स्कुल सावदाने डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज बीसीए जळगावचा परावभ करीत विजेतेपद पटकावले तर वुमन्स कॉलेज उपविजेता ठरला,तृतीय क्रमाकांचे पारितोषीक गोदावरी सीबीएसई जळगावने पटकावले. स्पर्धा यशस्वीतेसाठी आयोजक गोदावरी सीबीएससी स्कूल आणि गोदावरी आय एम आर यांच्या वतीने नीलिमा चौधरी प्राचार्य, डॉ. प्रशांत वारके संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. चंद्रकांत डोंगरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी काम बघितले सूत्रसंचालन डॉ. प्राजक्ता पाटील आणि असलम शेख यांनी केले.









