रुग्णसेवेसाठी पुढाकार
बुलढाणा (वृत्तसेवा) : शेगाव सामान्य रुग्णालयात रक्तपुरवठा कमी झाल्याने रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपच्या युवकांनी भोनगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त व मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

रक्तदान श्रेष्ठदान ग्रुप हा सदैव गरजू रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर असलेला युवकांचा संघटित समूह आहे. वेळ, काळ आणि परिस्थितीची अडचण न पाहता रुग्णसेवेसाठी पुढे येणारे असंख्य तरुण या ग्रुपमध्ये कार्यरत आहेत. महाराष्ट्रभर कुठेही रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास, त्याच ठिकाणी तातडीने रक्त उपलब्ध करून देण्याचे मोलाचे कार्य या ग्रुपच्या माध्यमातून केले जाते.
रक्तदान श्रेष्ठदान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आशिष सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पवन भारसाखळे, चेतन भामद्रे, मोहन देवीचे, स्वप्नील शेळके, विकास भारसाकळे, सागर भारसाकळे, प्रवीण भारसाकळे,धनंजय फरताडे, रवि फुडकर, दत्त आवळकर योगेश चांदूरकर, अभि कुठे, अभि हांडे, मेघराज कंकाळ, शुभम रेवस्कर, अभय हिंगने, अभिषेक पल्हाडे, अक्षय जढाळ, दीपक तायडे, अजय त्रिवेदी, निखिल तायडे, सुजल शर्मा, सचिन ढमाळ, राज वाधवानी, अमोल फोकमारे, आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.









