• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस अधिकाऱ्याचे घर जाळण्याचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 9, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

पाचोऱ्यात नगरदेवळा येथे घटना

पाचोरा (प्रतिनिधी):- नगरदेवळा येथील राऊळ गल्लीत मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र उमेश राऊळ यांच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून जाळपोळीचा प्रयत्न केल्याची घटना रात्री सुमारे ३ वाजेदरम्यान घडली. सुदैवाने घरातील महिलांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.

नगरदेवळा येथील रहिवासी सौ. किरण उमेश राऊळ (३२) हे दि. ७ फेब्रुवारी रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास आपल्या घरी असताना ही घटना घडली. एका विना नंबरच्या मोटारसायकलवरून दोन अज्ञात इसम तेथे आले. त्यांचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असून शरीराने मजबूत असलेल्या या दोघांनीही ओळख पटू नये म्हणून तोंडाला रुमाल बांधले होते. या हल्लेखोरांनी किरण राऊळ यांच्या घराच्या लाकडी दरवाजावर सोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल ओतले आणि आगपेटीच्या साहाय्याने आग लावून दिली.

दरवाज्याजवळील परद्याने तात्काळ पेट घेतल्याने घरात धूर पसरला. त्याचवेळी नंदकौर राऊळ यांना पेट्रोलचा तीव्र वास आणि उष्णतेची जाणीव झाली. त्यांनी तत्काळ आपली मुलगी किरण राऊळ यांना उठवले. सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा संशय होता. मात्र दरवाज्याजवळ लागलेली आग पाहताच त्यांनी धाडस दाखवत पाण्याच्या साहाय्याने आग विझवली.

आग विझवल्यानंतर बाहेर पाहणी केली असता पेट्रोलची रिकामी बिलसरी बाटली, माचिस पेटी आणि जळालेली आगकाडी आढळून आली. त्यामुळे हा प्रकार अपघाती नसून जाणीवपूर्वक जाळपोळीचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
शेजारील किराणा दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री २.५८ वाजता नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर दोन व्यक्ती आलेल्या स्पष्टपणे दिसून आल्या आहेत. हे फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

या घटनेमुळे नगरदेवळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस अधिकाऱ्याच्या घरावर झालेला हल्ला ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध वेगाने सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांनी दिली आहे. तपासात सहायक फौजदार निवृत्ती मोरे व पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील हे मदत करीत आहेत.


 

 

Tags: #pachora crime #jalgaon #jalgaon police
Previous Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू ; चालक फरार

Next Post

मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मधुमेही पाय – गंभीर पण टाळता येणारी समस्या

मधुमेही पाय - गंभीर पण टाळता येणारी समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
1xbet russia

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी
1xbet russia

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचा ९९ टक्के निकाल

June 26, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
1xbet russia

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

June 26, 2026
जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

जळगावात स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्याची मागणी

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon