जळगाव (प्रतिनिधी) :- डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जळगाव (खु.) येथे डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण या विषयावर संकरीत पध्दतीने निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) कार्यशाळेचे रविवार दि ८ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन रेडियोलॉजी विभागाशी संबंधित असून ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. केतकी पाटील हॉल, डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय जळगाव (खु.) येथे सुरू होणार आहे.कार्यशाळेत प्रसूतीमध्ये अल्ट्रासाऊंडच्या विविध पैलूंवर सखोल माहिती, सत्रे आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके (डेमोंस्ट्रेशन) घेतली जाणार आहेत. लोककल्याणकारी दृष्टिकोनातून २ एमएमसी क्रेडिट पॉइंट्सही येथे प्रदान केले जातील.प्रमुख सत्रांमध्ये पुढील विषयांचा समावेश आहे: पहिला ट्रायमिस्टर स्कॅन – एनटी आणि एनबी व्यतिरिक्त प्रसूती डॉपलरची भूमिका एएनसी मध्ये मातृत्व मृत्यू प्रतिबंधातील रेडिओलॉजीची भूमिका एनटी स्कॅन कसे करावे डेमोंस्ट्रेशन अनोमली स्कॅन करताना ट्रिक्स (डेमोंस्ट्रेशन) प्रसूती डॉपलर प्रत्यक्ष करताना टिप्स दिल्या जाणार आहे.डॉ. रुचिता बागडी डॉ. किरण पाटील डॉ. अंजली भिरूड/डॉ. वैशाली चौधरी एनटी स्कॅन कसा करतो (प्रात्यक्षिक) अॅनोमली स्कॅन करतानाच्या युक्त्या (प्रात्यक्षिक)ऑब्स्टेट्रिक डॉप्लर करण्यासाठीच्या टिप्स (प्रात्यक्षिक)डॉ. राजकिरण राठी इ तज्ञ मार्गदर्शन करणार आहे. कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी व ऑफलाइन नोंदणी करण्यात येणार असून ३ फेब्रुवारीपासून तसेच स्पॉट नोंदणी उपलब्ध असेल. नोंदणीसाठी पुढील लिंकवर भेट देता येईल https://godavarifoundation.com/CPI/cme.html अधिक माहितीसाठी संपर्क डॉ. राजकिरण राठी – ७५८८८१०२२२, डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी – ९८४८०८६८७४ करावा.











