• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बँकेने जप्त केलेले घर सील तोडून बळकावले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 4, 2026
in Uncategorized
0
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

जळगाव तालुक्यात जळके येथे कर्जदारावर गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी):- बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे कायदेशीररीत्या जप्त करण्यात आलेले घर, बँकेचे सील तोडून पुन्हा अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील जळके येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळके येथील रहिवासी प्रशांत नाना पाटील यांनी २०१८ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून आपल्या राहत्या घरावर १० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. मात्र, दीर्घकाळ उलटूनही त्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. बँकेने वारंवार नोटिसा बजावूनही प्रतिसाद न मिळाल्याने, अखेर महसूल विभागाच्या मदतीने या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. नायब तहसीलदार डी. बी. जाधव यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घराचा ताबा बँकेकडे सोपवला होता आणि बँकेने घराला आपले अधिकृत सील व नोटीस लावली होती.

असा उघड झाला प्रकार
२१ जानेवारी २०२६ रोजी जळके शाखेचे बँक मॅनेजर मृणाल गजानन सुकदेवे हे जप्त केलेल्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी गेले असता, त्यांना धक्कादायक दृश्य दिसले. संशयित प्रशांत पाटील यांनी बँकेची कोणतीही परवानगी न घेता घराचे सील तोडले होते आणि लावलेली नोटीस फाडून टाकली होती. इतकेच नव्हे तर, संपूर्ण कुटुंबासह त्यांनी घरात अनधिकृतपणे प्रवेश करून पुन्हा वास्तव्य सुरू केले होते.

पोलिसांत गुन्हा दाखल
बँकेच्या कामात अडथळा आणून सरकारी प्रक्रियेद्वारे जप्त केलेली मालमत्ता बेकायदेशीरपणे बळकावल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अधिकृत अधिकारी कृष्णकुमार विनायकराव डेकाटे (वय ४८) यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत नाना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर लोखंडे करत आहेत.


 

 

Previous Post

गर्भवती महिलांनो आता प्रसूतीच्या वेदना विसरा…!

Next Post

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उपमुख्यमंत्र्यांचा पीए भासवून १८ जणांची केली ५५ लाख रुपयात फसवणूक, जळगावात गुन्हा दाखल

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ६ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई
1xbet russia

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस
1xbet russia

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण
1xbet russia

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

May 7, 2026
 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा
1xbet russia

 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

May 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

नाल्यात बायोमेडिकल वेस्ट टाकणाऱ्या रुग्णालयावर महापालिकेची कारवाई

May 7, 2026
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

May 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon