चाळीसगाव तालुक्यात घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – गिरणा नदीच्या पात्रात बुडून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यशवंत फकिरा निकवाडे (वय ४५, रा. संबोधी, ता. धुळे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निकवाडे हे गिरणा नदीच्या पात्रात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. घटनेची माहिती मिळताच


मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शांताराम पवार यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना पाण्याबाहेर काढले व तातडीने ग्रामीण रुग्णालय, मेहुणबारे येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शामकांत सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.









