नवीमुंबई (वृत्तसंस्था) – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 10 रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा चारशेचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे.जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 402 वर पोहचली आहे. मृत्यू झालेल्या एका व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16 झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 5 रत्नागिरीतील असून कामथे येथील एक दापोली येथील 2 आणि संगमेश्वर येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. यातील दापोली येथील एक रुग्ण 11 तारखेला दाखल करण्यासाठी आणला असता त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या 16 झाली आहे. तर 7 रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 267 झाली आहे. सध्या 118 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.