जळगाव शहरात घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जळगाव शहरातील एका परिसरात १७ वर्षीय मुलीला संशयित आरोपी राहुल रमेश राठोड (वय २५) याने दि. २९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास फूस लावून पळवून नेले. आरोपीने तिला गुजरात राज्यातील सुरत येथे आपल्या बहिणीच्या घरी नेले. दिनांक ३० जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास, सुरत येथील घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत आरोपीने पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, “याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकीही दिली.
पीडितेने जळगावात परतल्यानंतर दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित
आरोपी राहुल रमेश राठोड (वय २५, रा. चैताली टेंट हाऊस जवळ, पिंप्राळा, जळगाव) याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तपास सपोनि भूषण कोते करत आहे.









